अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी स्फोटात एक ठार, In Ambaranath blast Chemical Company one killed

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी स्फोटात एक ठार

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनी स्फोटात एक ठार
www.24taas.com,झी मीडिया, अंबरनाथ

अंबरनाथच्या मोरीवली MIDCमध्ये अनथा ऑरगॅनिक्स कंपनीमध्ये केमिकलचा स्फोट होउन भीषण आग लागली. यात कंपनीचे मालक सी. नायारण (63) जागीत ठार झालेत. तर पाच जण गंभीर जखमी झालेत. आगीत कंपनी पूर्णपणे जाळून खाक झालीये.

हा स्फोट इतका भीषण होता की 1 किमी परिसरात घरांचे पत्रे उडाले. बाजुच्या हंसा पॅकेजिंग आणि अन्य दोन कंपन्यांनाही आगीनं वेढलं. अग्निशमन दलाच्या 15 ते 20 गाड्यांनी पाच तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. मोरीवली एम्आयडीसी परिसरातली महिन्याभरातली ही दुसरी आगीची घटना आहे.

या कंपनीमध्ये तीन शिफ्टमध्ये 25 कामगार काम करतात. स्फोट झाला त्यावेळी जेवणाची सुट्टी झाली होती. त्यामुळे कामगार बाहेर गेले होते. सुदैवाने मोठी जीवित हानी टळली. दरम्यान, स्फोटामुळे अन्य कंपन्यांना याची झळ बसली. स्फोटामुळे लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी पाच तास लागलेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 26, 2014, 08:16


comments powered by Disqus