Last Updated: Saturday, July 6, 2013, 12:38
www.24taas.com,झी मीडिया,खोपोलीरायगड जिल्ह्यातील खोपोलीमधल्या इंडिया स्टील कंपनीच्या भट्टीमध्ये काल रात्री भयंकर स्फोट झाला. यात १० जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटानंतर वितळलेल्या लोखंडाचे तीन गोळे बाजूच्या वस्तीच्या दिशेनं फेकले गेले.
या स्फोटामुळे काही घरांची कौलं तोडून हे गोळे घरांमध्ये पडले. यामध्ये काही लहान मुलांसह किमान १० जण जखमी झालेत. एकाची प्रकृती गंभीर असून त्याला मुंबईतल्या एका रुग्णालयात हलवण्यात आलं.
कंपनीच्या कम्पाऊंडजवळ ही भट्टी होती. त्यामुळे आसपासच्या वस्तीचं मोठं नुकसान झालंय. हा स्फोट इतका मोठा होता की जवळजवळ सर्व शहरांत त्याचा आवाज ऐकू गेला.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कंपनीमध्ये तोडफोड केली. कंपनीच्या काही गाड्याही फोडण्यात आल्यात.
#
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.#
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, July 6, 2013, 09:45