धक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्तInsteed of B+ blood group hospital give B- ve g

धक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्त

धक्कादायक: रुग्णाला ‘ए’+ ऐवजी दिलं ‘ए’ निगेटिव्ह रक्त
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

एका रुग्णाला ‘ए’ पॉझिटिव्हऐवजी ‘ए’ निगेटिव्ह रक्त दिल्याची घटना ठाण्यातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घडलीय.

ठाण्यातल्या वाडा इथं सोनू पांडे नावाचा मुलगा गेल्या १० वर्षापासून भिवंडी सुधारगृहात राहतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या पोटात दुखू लागल्यानं ठाण्यातल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीत सोनूच्या पोटातील आतड्यांना गँगरींग झाल्याचं समजलं. त्यामुळं त्याचं ऑपरेशन करावं लागलं.

त्यासाठी सोनूचा रक्त ग्रुप ‘ए ‘पॉझिटिव्ह या रक्ताची गरज होती. मात्र सिव्हील हॉस्पिटलमध्ये या ग्रुपचं रक्त नव्हतं. त्यामुळं सिव्हील हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ‘ए’ निगेटिव्ह रक्त चढवल्यामुळं खळबळ पसरली.

मात्र ‘ए’ पॉझिटिव्ह रक्त असेल तर त्याच ग्रुपचं ‘ए’ निगेटिव्ह रक्त देवू शकतो. त्यामुळं रुग्णाला कसलाच धोका नसतो, असं स्पष्टीकरण हॉस्पिटल प्रशासनानं दिलंय. तसंच सोनूच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत असल्याचंही त्यांनी सांगितलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


पाहा व्हि़डिओ




First Published: Saturday, December 21, 2013, 13:41


comments powered by Disqus