खालापूर इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात, चार महिला जखमी, Khalapur imejika theme park in the accident,

खालापूर इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात, चार महिला जखमी

खालापूर इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात, चार महिला जखमी
www.24taas.com, झी मीडिया, खालापूर

रायगड जिल्ह्यातल्या खालापूरच्या इमॅजिका थीम पार्कमध्ये अपघात झालाय. या अपघातात चार महिला जखमी असून यातली एक महिला गंभीर जखमी आहे.

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी एकच्या सुमारास रोलर कोस्टरच्या एका बोगीचं चाक निखळल्यानं हा अपघात झालाय.

सध्या रोलर कोस्टरची राईड बंद ठेवण्यात आल्याचं इमॅजिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. मात्र थीम पार्कमधील इतर राईड्स सुरू ठेवण्यात आल्या आहेत.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 5, 2014, 18:27


comments powered by Disqus