मित्रांची मस्करी जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या , killing a friend in Thane

मित्रांची मस्करी जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या

मित्रांची मस्करी जीवावर, दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाण्यात मस्करीवरून झालेल्या हाणामारीत एका शाळकरी मुलाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकमेकांना चिडविण्यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. यात त्यांची झटापट झाली आणि त्यातील दहावीच्या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला.

दीपक यादव (१५) हा इयत्ता १०वीत शिकत होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या मित्राला अटक केली. तो अल्पवयीन असल्याने त्याला भिवंडीतील बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. वागळे इस्टेट येथील साठेनगर परिसरात दीपक राहत होता. त्याच्या वडिलांचे वर्षापूर्वीच निधन झाले होते. वर्षश्राद्ध असल्याने त्याने डोक्यावरचे केस काढले होते. घरातून बाहेर पडताना तो टोपी घालत असे. त्याच्या शाळेत सातवीत शिकत असलेल्या १२ वर्षीय मित्राने या टोपीवरून मस्करी केली. या मस्करीचे रूपांतर हाणामारीत झाले.

या हाणामारीत दीपकच्या गुप्तांगावर गंभीत दुखापत झाली. उपचारासाठी त्याला सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचे निधन झाले. दीपकला दोन बहिणी असून त्याची आई मॉलमध्ये नोकरी करते. या प्रकरामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, October 10, 2013, 14:22


comments powered by Disqus