Last Updated: Tuesday, April 15, 2014, 08:40
www.24taas.com, झी मीडिया, उक्शीतब्बल वीस तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालीय. मालगाडीचे डबे काढण्याचे काम पूर्ण झाले असून मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना करण्यात आलीय.
वाहतूक सुरू झाल्यानं कोकण रेल्वेच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. असं असलं तरी वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही तास लागण्याची शक्यता आहे.
आज पहाटे ४.४० वाजेपर्यंत मालगाडीचे डबे रुळावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर या रुळावरून पहिली ट्रेन ६.५० वाजता निघाली... आणि खोळंबलेल्या प्रवाशांच्या जीवात जीव आला.
शनिवारी, सकाळी कोकण रेल्वे मार्गावर मालगाडीचे चार डब्बे घसरल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. उक्शी रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली होती. हे डब्बे मार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वेनं अनेक गाड्या रद्द केल्या होत्या. यामुळे, प्रवाशांना बराच त्रासही सहन करावा लागलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, April 15, 2014, 08:14