कॅन्सरग्रस्त मुलांना कोकण रेल्वेने घडविले गोवा दर्शन, Konkan Rly gives a free joy trip children

कॅन्सरग्रस्त मुलांना कोकण रेल्वेने घडविले गोवा दर्शन

कॅन्सरग्रस्त मुलांना कोकण रेल्वेने घडविले गोवा दर्शन
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या आजारातून बाहेर पडण्यासाठी आणि त्यांच्या जीवनात नवी उमेद-भरारी आणण्यासाठी कोकण रेल्वेने कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मुलांला गोवा दर्शन घडविले आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये ही मुलं सध्या उपचार घेत आहेत.

कॅन्सरने ग्रस्त असलेल्या चिमुरड्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी कोकण रेल्वेने हा उपक्रम हाती घेतलाय. टाटा हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या ६० मुलांना कोकण रेल्वेने गोवा दर्शनासाठी नेलेय. चार दिवसांच्या या दौऱ्यानंतर ही मुले मुंबईत परतणार आहेत.

कोकण रेल्वेच्या पुढाकाराने कॅन्सरग्रस्त मुलांना धम्मालमस्ती करण्याची संधी मिळाली. गोव्यातील निसर्गरम्य ठिकाणीही फिरवण्यात येत आहे. या मुलांमध्ये तीन ते १६ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश आहे. कोकण रेल्वे प्रशासनातर्फे २००७ पासून हा उपक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती कोकण रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी दिली.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 30, 2013, 10:25


comments powered by Disqus