बिबट्यानं उडवली ठाणेकरांची झोप! Leopard in the area of Hiranandani in Thane, people panic

बिबट्यानं उडवली ठाणेकरांची झोप!

बिबट्यानं उडवली ठाणेकरांची झोप!
www.24taas.com , झी मीडिया, ठाणे

ठाण्यातल्या हिरानंदानी परिसरात रात्री अचानक बिबट्या आला. हा बिबट्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. ठाण्यातल्या सर्वात पॉश भागातल्या हिरानंदानी इस्टेट परिसरातल्या वेलेन्टीनो या इमारतीत हा बिबट्या दिसला.

सोमवारी रात्री दोनच्या आसपास बिबट्याला पाहिल्याचं बिल्डिंगच्या वॉचमननं सांगितलं. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण असून बिबट्याला लवकरात लवकर पकडण्याची मागणी नागरिकांनी केलीय.

जंगलातून नागरी वस्तीत बिबट्यांचं येणं काही नवीन नाही. मात्र अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतेय. अनेकदा बिबट्या लोकवस्तीमध्ये पाहायला मिळतोय. मात्र हिरानंदानी सारख्या पॉश भागातल्या सोसायटीमध्ये बिबट्याचा वावर म्हणजे खरोखर भीतीचंच कारण आहे.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, September 4, 2013, 09:48


comments powered by Disqus