Last Updated: Wednesday, December 4, 2013, 17:10
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबईनवी मुंबईत पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. जुईनगरमधील विशाल ज्वेलर्सवर मंगळवारी रात्री दरोडा पडला, दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवत दीड किलो सोने पळवून नेले. पाच दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर सोने घेऊन पोबारा केला.
जुईनगर सेक्टर - २४ मधील सुरभी अपार्टमेटमध्ये असलेल्या विशाल ज्वेलर्स वर मंगळवारी पावणेदहाच्या सुमारास पाच अज्ञात तरूण शिरले त्यानी , प्रथम दुकानाची तोडफोड केली , त्यानंतर दुकानातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवत सोने लुटून नेले. तब्बल दीड किलो सोने दरोडेखोरांनी लुटून नेले .
याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दरोड्याच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे, अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Wednesday, December 4, 2013, 17:06