Last Updated: Wednesday, December 4, 2013, 17:10
नवी मुंबईत पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. जुईनगरमधील विशाल ज्वेलर्सवर मंगळवारी रात्री दरोडा पडला, दरोडेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवत दीड किलो सोने पळवून नेले. पाच दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला आणि दुकानाची तोडफोड केली. त्यानंतर सोने घेऊन पोबारा केला.