माळशेज घाटातला प्रवास होणार सुखकर , MALSHEJ GHAT

माळशेज घाटातला प्रवास होणार सुखकर

माळशेज घाटातला प्रवास होणार सुखकर
www.24taas.com, कल्याण

पावसळ्यात दरड कोसळून, रस्ते खचून बंद होणारा कल्याण - अहमदनगर महामार्गावरचा माळशेज घाट आता सुलभ झालाय. या मार्गावररचे २६ धोकादायक वळणे आणि चढ कमी करण्याचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या घाटातला प्रवास सुखकर होणार आहे.

राष्ट्रीय महामार्ग २२२ वरचा माळशेज घाट हा एक महत्तवाचा टप्पा. सावरणे ते माळशेज हे १० किलोमीटर अंतर असलेल्या माळशेज घाटात प्रत्येक पावसाळ्यात दरड कोसळून वाहतुकीचा खोळंबा होत असे. तसेच काही धोकादायक वळणांमुळे घाटांत अनेकदा अपघातही झाले आहेत.


धोकादायक वळणं कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रधीकराणाकडून १० कोटींचा निधी मिळाला होता. या निधीतून झालेल्या कामांअतर्गत घाटातले २६ धोकादायक वळणे कमी कण्यात येत आहेत. तसेच वारंवार ज्या ठिकाणी रस्ता खचतो तिथं संरक्षक भिंत तसेच ज्या ठिकाणी तिथं त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे.

माळशेज घाट हा वाहतुकीसाठी कल्याण -नगर महामार्गावरील अत्यंत महत्वाचा घाट आहे त्याच बरोबर पर्यटकानाही या घटाचे आकर्षण असते त्यामुळे आता या घाटात सुधारणा झाल्यास यंदाच्या पावसाळ्यात पर्यटकांसाठी पर्वणीच ठरणार आहे .

First Published: Monday, April 22, 2013, 12:25


comments powered by Disqus