‘मांडवी एक्स्प्रेस’चा डबा घसरला, मोठा अपघात टळला Mandvi Express coach fell down from railway Track

‘मांडवी एक्स्प्रेस’चा डबा घसरला, मोठा अपघात टळला

 ‘मांडवी एक्स्प्रेस’चा डबा घसरला, मोठा अपघात टळला
www.24taas.com , झी मीडिया, रत्नागिरी

खेडजवळ आज सकाळी मांडवी एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यानं कोकण रेल्वेची सेवा ठप्प झालीय. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन आणि पहिला डबा खेड रेल्वे स्टेशनजवळ रूळावरून घसरला. मात्र रेल्वेरुळ तुटल्याचं चालकाच्या लक्षात येताच चालकानं हजरजबाबीपणा दाखवून एक्स्प्रेस थांबविण्याचा प्रयत्न केला आणि मोठा अपघात टळला.

एक्स्प्रेसचं इंजिनच रुळावरून घसरल्यानं वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. घटनास्थळी कोकण रेल्वेचे अत्यावश्यक सेवापथक दाखल झालं असून वाहतूक सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. चालकाच्या प्रयत्नांमुळंच मोठा अपघात टळल्याचं प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी सांगितलं. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर आलीय.

सीएसटीहून मडगावकडे जाणारी ही एक्स्प्रेस होती. या मार्गावरील वाहतूक सध्या पूर्णपणे ठप्प झालीय. दुरुस्तीच्या कामाला किती वेळ लागले याचा निश्चित अंदाज सांगता येत नसला तरी लवकरात लवकर या मार्गावरील वाहतूक पूर्वत करण्यात येणार आहे, असं कोकण रेल्वेकडून सांगण्यात येतंय.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, October 6, 2013, 16:39


comments powered by Disqus