Last Updated: Sunday, March 10, 2013, 11:24
www.24taas.com, नेरळ माथेरान थंड हवेचं ठिकाण. याठिकाणी नेहमी गजबज असते ती प्रेमीयुगलांची. मात्र, थंड हवेच्या ठिकाणी मती गुंग करणारी घटना घडली. माथेरानमध्ये धक्कादायक बाब उघड झाली आहे. लग्नाची मागणी करणाऱ्या प्रेयसीची प्रियकराने गळा चिरून हत्या केल्याची घटना शनिवारी माथेरानमध्ये घडली.
प्रेयसीची हत्या करणारा तिचा प्रियकर बिन्नी बनॉर्ड (३१) हा पळून जाण्याच्या तयारी असताना त्याला तेथील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ठाण्यातील बिन्नी याचे कांदिवलीत राहणाऱ्या आरती देवराम यंदे (२५) हिच्याशी काही दिवसांपूर्वी ओळख झाली. त्यानंतर त्याचे संबंध प्रेमात झाले. ती दोघं माथेरानला फिरायला आली होतीत. आरतीने बिन्नीकडे लग्न कधी करणार असे विचारले. त्यावेळी दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. मात्र, हा किरकोळ वाद तिच्या जीवनाचा शेवट करणारा ठरला.
लग्नाच्या मागणीवरून प्रेयसीचा गळा चिरणाऱ्या बिन्नी या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. आरती त्याला विवाह करण्यास सांगत होती. मात्र, बिन्नी हा विवाहित असल्याचे पुढे आले आहे. शनिवारी आरतीला माथेरानला घेऊन बिन्नी आला आणि तिला काळोखी पॉइंटवर नेले. यावेळी त्यांच्यात वाद झाला.
वादाचे रूपांतर भांडणात झाले. संतापलेल्या बिन्नी याने आरतीच्या मानेवर धारधार कटरने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर तो पळू लागला. याचवेळी माथेरानमधील एका रहिवाशाने त्याला पकडले. जाताना दोघं होतीत, येताना हा एकटा कसा, असा संशय एका नागरिकाला आल्याने अन्य नागरिकांना त्यांने याबाबत माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी बिन्नीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
First Published: Sunday, March 10, 2013, 11:23