Last Updated: Tuesday, January 21, 2014, 18:44
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई चित्रपट लेखिकेचा लोणावळ्यात विनयभंग झाल्याची घटना लोणावळ्यात घडली आहे. चित्रपटात काम मिळवून देतो, असं आमीष दाखवून या भामट्यांनी या तरूणीला फसवलं आहे.
या दोन भामट्यांच्या विरोधात लोणावळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी फारूकअली नुरमहंमद अन्सारी याला पोलिसांनी अटक केली आहे, न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. दुसरा आरोपी अद्याप फरार आहे.
तरूणीने मुंबईत ओशिवरा पोलिस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली होती. यानंतर हा गुन्हा लोणावळा शहर पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार मित्राच्या चित्रपटात काम मिळवून देतो, असं सांगून या तरूणीला आरोपींनी लोणावळ्यात आणलं, त्यानंतर या तरूणीला हॉटेलमध्ये नेलं. यातील एका भामट्याने रूद्राक्ष राजेभोसले नाव धारण केलं आहे. हा रूद्राक्ष सध्या फरार आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 21, 2014, 15:49