मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, Mumbai disrupting Central train services

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत
www.24taas.com,ठाणे

दिवा येथे मालगाडीचा डबा घरसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटांने धावत होत्या. दरम्यान, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.

दिवा स्टेशनदरम्यान माल वाहतूक गाडीची डबा रूळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे येणारी पर्यायी वाहतूक स्लो ट्रॅकवरून वळविण्यात आली होती. त्रयामुळे मुंबईकडे येणाऱी फास्ट ट्रॅकवरील वहतूक बंद करण्यात आली.. त्यामुळे प्रवाशांचे सकाळी हाल झालेत.

दिवा येथे काही एक्सप्रेस गाड्या थांबविल्या होत्या. त्यामुळे वाहतुकीवर ताण आला आहे. त्यामुळे १५ ते २० मिनिटाने गाड्या उशिराने धावत होत्या. त्यातच आज मेगाब्लॉक असल्याने प्रवाशांना कसरत करावी लागत आहे.

First Published: Sunday, November 25, 2012, 08:46


comments powered by Disqus