खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी, Mumbai - Goa highway, accident

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी
www.24taas.com, मुंबई

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

महामार्गावरील अरूंद पुलामुळे झालेली वाहतुकीची कोंडी तसेच मदत कार्यात येत असलेला अडथळा आणि वैद्यकीय मदतीचा वानवा अपघातानंतर दिसून आला. जगबुडी नदीच्या पुलावरून बस पात्रात कोसळली. मात्र, प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बसचा पत्रा कापावा लागला. मदत मिळण्यास उशीर झाल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झालाय.
खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी काल विधान परिषदेत सांगितले. तर खेड येथे अपघात झालेल्या ठिकाणापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील कळमणी गावातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये फिजिशियन उपलब्ध नसल्याने येथील अतिदक्षता विभाग बंद असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री फौजिया खान यांनी विधान परिषदेत दिली.

या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना २ लाख तर जमींना ५० हजार रूपयांची मदत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली आहे. दरम्यान, अपघात ठिकाणाला नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव, आरोग्य मंत्री सुरेश शेट्ठी, भाजपचे विनोद तावडे आणि आमदार यांनी भेट देऊन पाहाणी केली.
खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

महामार्गावरील त्रुटी

- ६०० कि.मी.च्या या महामार्गावर ११४ ठिकाणी अपघातप्रवण असून, येथे अपघात झाल्यास जखमींना उपचारासाठी गोवा अथवा कोल्हापूर येथे न्यावे लागते. या प्रवासात अनेक जखमी दगावतात, अशी लक्षवेधी मांडण्यात आलेय.

- अनेक ठिकाणी अरूंद पुल आहेत. खेड जगबुडी नदीवरील शंभर वर्षे जुना झालेला हा पूल आहे. तो धोकादायक स्थितीत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

- बृहत आराखड्यात मंजूर झालेले कोकणातील अलिबाग, पनवेल, महाड, चिपळूण, संगमेश्व र, सावंतवाडी येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्यास प्राधान्य दिले गेले नाही. तर वडखळ नाका, राजापूर आणि तराळा येथे ट्रॉमा सेंटर उभारण्याचे प्रस्तावित आहेत, मात्र, पुढे काम सरकलेले नाही.

- सावंतवाडी येथे रक्तपेढी सुरू करण्यात आलेली नाही. पनवेल येथे शंभर खाटांच्या इस्पितळाचे काम सुरू करण्यात येण्याची घोषणा झाली. मात्र, त्याचे काम कोठे अडले आहे, ते समजत नाही.

First Published: Wednesday, March 20, 2013, 13:53


comments powered by Disqus