खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 13:53

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:57

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

बस नदीत कोसळली; ३७ जण ठार, १५ जखमी

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 11:36

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नदीत कोसळून भीषण दूर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत.