अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत , Mumbai - Goa highway issue in Parliament

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत
www.24taas.com,नवी दिल्ली

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

मुंबई-गोवा महामार्गावर शेकडो अपघातांत अनेकांचे बळी गेले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून पडून आहे. या महामार्गाचे चौपदरीकरण होणार आहे का? चौपदरी करणाचा प्रस्ताव सादर करण्यात आला असताना एक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आले आहे. महामार्गावर अपघात होत आहेत, याकडे खा. अनंत गिते यांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी खेड येथील अरूंद पुलावरून खासगी बस जगबुडी नदीत कोसळली. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातात परदेशी रशियन पर्यटकांपैकी चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झालेत. तर ठार झालेल्यांपैकी अन्य मुंबईतील प्रवासी आहेत.

First Published: Tuesday, March 19, 2013, 13:57


comments powered by Disqus