Last Updated: Tuesday, March 18, 2014, 17:37
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेबदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यामुळे बदलापूरमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, या गोळीबाराचा निषेध म्हणून मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.
योगेश राऊत आणि त्यांचे भाऊ जयेश राऊत यांची चार व्यक्तींशी दुर्गा हॉटेलमध्ये बाचाबाची झाली. यादरम्यान एकाने योगेश यांच्यावर गोळी झाडली आणि तेथून पोबारा केला.
जखमी झालेल्या योगेश यांना तात्काळ डोंबिवलीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.
First Published: Tuesday, March 18, 2014, 17:33