बदलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 17:37

बदलापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष योगेश राऊत यांच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. त्यामुळे बदलापूरमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान, या गोळीबाराचा निषेध म्हणून मंगळवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे.