जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळला, nuclear energy project in jaitapur

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळला

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा विरोध मावळला
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचा असलेला विरोध कमी करण्यात उद्योगमंत्री नारायण राणे यांना यश आलंय.प्रकल्पाचा विरोध करणाऱ्या जनहित सेवा समितीमध्ये फूट पडलीय.

राणेंच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीमध्ये जनहित सेवा समितीबरोबर बैठक झाली. समितीचे अध्यक्ष प्रविण गवाणकर यांच्यासह१० प्रमुख पदाधिकारी या बैठकिला उपस्थित होते. दरम्यान कोकण बचाव समितीने मात्र आपला विरोध कायम ठेवत जनहित सेवा समिती आर्थिक अमिषाला बळी पडल्याचा घाणाघाती आरोपही त्यांनी केलाय..

कोकणात जैतापूर अणु ऊर्जा प्रकल्प होऊ देणार नाही, असा घेण्यात आलेला पवित्रा तीन वर्षांनंतर मोडीत निघाला आहे. माडबन संघर्ष सेवा समितीने आपला विरोध मागे घेतलाय. प्रकल्पाबाबत समितीने समझोता करण्याची तयारी दाखवली आहे. समितीच्या सदस्यांनी नारायण राणेंची भेट घेतली. या बैठकीनंतर प्रकल्पाचा विरोध मागे घेत असल्याचं समितीनं जाहीर केले.

समितीने २५ सूचना केल्या असून लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावर चर्चा केली जाणार आहे, अशी माहिती नारायण राणे यांनी दिली. दरम्यान, माडबन जनहीत सेवा समितीचे अध्यक्ष प्रवीण गवाणकर यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. समितीच्या या भूमिकेमुळे जैतापूर प्रकल्पाला विरोध करणार्‍या शिवसेनेला चांगलाच धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदल देण्याचं जाहीर केला आणि त्यानंतर अनेक प्रकल्पग्रस्तांनी मोबदला घेण्यास सुरूवात केली. तर या आंदोलनाचे नेतृत्त्व करणार्‍या प्रवीण गवाणकर यांना आजाराने ग्रासलं आहे. त्यामुळे त्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर आंदोलनातील विरोध मावळ्याचे म्हटले जात आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Saturday, August 31, 2013, 09:41


comments powered by Disqus