`रेल्वे`गर्दीचा आणखी एक बळी, दोन जखमी, one dead in crowded train

`रेल्वे`गर्दीचा आणखी एक बळी, दोन जखमी

`रेल्वे`गर्दीचा आणखी एक बळी, दोन जखमी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर झालेत. कर्जत-सीएसटी लोकलमधून पडल्यानं ही दुर्घटना घडलीय.

सीएसटीहून बदलापूरमार्गे जाणाऱ्या लोकलमधून बदलापूरजवळ तीन जण पडल्याची घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. रविवारी सकाळपासून बदलापूरजवळ रेल्वे डब्बा घसरल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळं रेल्वेला प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीमुळं ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. दरम्यान, मध्य रेल्वेने रविवारी कल्याण-ठाणे दिशेकडील अप धीम्या गतीसह कल्याण-अंबरनाथ मार्गावर मेगाब्लॉक घेतला होता. त्यामुळे दिवा, मुंब्रा,कळव्यासह कर्जत, बदलापूरहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांचे आधीच हाल सुरु होते. यात दुपारी शटल सेवेचा डबा बदलापूरजवळ घसरल्याने प्रवाशांच्या हालात आणखी भर पडली आणि ही दुर्घटना घडली.

रेल्वेतून पडलेल्यांपैकी एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमीवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मृत प्रवासी अंबरनाथचा असून दोघे जखमी मुंबईचे प्रवासी आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, July 22, 2013, 09:08


comments powered by Disqus