हप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू, one gunda dead in ratnagiri

हप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू

हप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी
रत्नागिरीतल्या खाऊ गल्लीत विक्रेत्यांकडे हप्ता मागायला गेलेल्या दोन गुंडांना विक्रेत्यांनी चोप दिलेला वासीन मोमीन उर्फ उंड्याचा मृत्यू झालाय... .

खाऊ गल्लीतला विक्रेते धर्मराज निषाज यांच्याकडे हप्ता मागण्यासाठी आणि त्याचा साथीदार गेले होते. त्यावेळी धर्मराज यांनी हप्ता देण्यास नकार दिल्यानं त्यांच्यावर या गुंडांनी वार केलाय. धर्मराज यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी उंड्याला चांगलाच चोप दिला.

यावेळी उड्यांच्या पोटात सुरा घुसल्यानं तो गंभीर जखमी झाला. तर त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला. धर्मराज आणि उंड्यावर रत्नागिरीतल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते..मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झालाय.. . ऐन गर्दीच्या वेळी खाऊ गल्लीत ही हाणामारी झाल्यानं रत्नागिरीत खळबळ उडालीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, January 10, 2014, 13:53


comments powered by Disqus