Last Updated: Tuesday, December 25, 2012, 13:22
www.24taas.com, पनवेलपनवेलमध्ये १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजू कांबळे या ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे.
पीडित मुलगी २३ डिसेंबर रोजी नेरुळच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बहिणीला बघण्यासाठी गेली. नेरुळहून परतत असताना ती रस्ता चुकली.
त्यावेळी राजू कांबळे यांने तिला घरी नेवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी मुलीच्या घरच्यांनी तक्रार केल्यानंतर कांबळेला अटक करण्यात आली. त्यामुळे महिला किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं.
First Published: Tuesday, December 25, 2012, 13:14