Last Updated: Saturday, October 26, 2013, 07:50
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगुजरात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेला नारायण साई याच्या विरारमधील आश्रमात बसल्याच्या संशयावरून पोलिसांनी आरासाम बापूंच्या विरारच्या आश्रमावर काल धाड टाकली.
विरारमधील कुंभार पाडा या गावातील आश्रमात नारायण साई नेहमी येत असल्याची माहिती गुजरात पोलीसांना मिळाली त्यामुळे नारायण साई या आश्रमात लपून बसल्याचा संशय गुजरात पोलिसांना होता. यावरून गुजरात पोलिस आणि विरार पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. मात्र आश्रमात कर्मचा-यांव्यतिरीक्त अन्य कोणीही आढळून आलं नाही.
सोळा वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू आणि मुलगा नारायण साई याच्यावर सुरत येथे बलात्काराचा गुन्हा् दाखल झाला आहे. नारायण साई फरार असून, परदेशात पळून जाण्यावची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सुरत पोलिसांनी `लुकआऊट` नोटीस काढली आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Saturday, October 26, 2013, 07:50