Last Updated: Sunday, May 5, 2013, 08:42
www.24taas.com, झी मीडिया, पनवेलसायन-पनवेल महामार्गावर कपल बारवर काल रात्री पोलिसांनी छापा टाकलाय. यात १०० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आलंय. यात ९० तरुणींचा समावेश असून त्यातल्या काही अल्पवयीन असण्याची शक्यता आहे.
बारमध्ये असलेल्या क्लबमधून १ कोटी रुपये रोख आणि २५ तोळे सोनं जप्त करण्यात आलंय. पहाटे २ वाजता ही धाड पडलीये. कारवाई अद्याप सुरू आहे...
या बारमधून इतर बारमध्ये मुली पुरविल्या जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यामुळे ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
First Published: Friday, May 3, 2013, 20:43