Last Updated: Tuesday, January 21, 2014, 12:14
www.24taas.com, झी मीडिया, डोंबिवली महिला, मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्यामूळ असुरक्षित असल्याच म्हटलं जातं. मात्र, लहान मुलींसह आत्ता अल्पवयीन चिमुरडी मुलंसुद्धा लैंगिक विकृतीचे शिकार होऊ लागल्याचं उघड झालंय.
डोंबिवलीत दुसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या शाळकरी चिमुरड्यावर एका विकृत नराधमानं लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय. हा चिमुरडा घरात एकटाच असल्याची संधी साधत एका तरुण त्याच्या घरात घुसला. आणि चिमुरड्याचं तोंड कापडानं दाबून त्याला चाकूचा धाक दाखवून या तरुणानं त्याच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले.
या चिमुकल्याचे कुटुंबीय जेव्हा घरी परतले तेव्हा आपल्या लहानग्याला होत असलेल्या रक्तस्त्रावामुळे त्यांना याची कल्पना आली. या घटनेमुळे या चिमुकलाही प्रचंड हादरलाय.
या संदर्भात संबंधित चिमुरड्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी आरोपी नीरज कुमारला गजाआड केलाय. सत्र न्यायालयानं आरोपी नीरजला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.
व्हिडिओ पाहण्यासाठी :- •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 21, 2014, 12:09