शिवसेनेचं शिष्टमंडळ `मरे`च्या व्यवस्थापकांच्या भेटीला Shiv Sena`s panel meet Railway`s management

शिवसेनेचं शिष्टमंडळ `मरे`च्या व्यवस्थापकांच्या भेटीला

शिवसेनेचं शिष्टमंडळ `मरे`च्या व्यवस्थापकांच्या भेटीला
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे

ठाणे आणि परिसरातील रेल्वेच्या समस्या मांडण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची आज भेट घेतली.

शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख एकनाथ शिंदे, कल्याण डोंबिवलीच्या महापौर पाटील , अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकरसह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. ठाणे ते अंबरनाथपर्यंतच्या रेल्वेच्या विविध समस्या यावेळी मांडल्या. काही प्रमुख मागण्या यावेळी रेल्वे प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या आहेत. विठ्ठलवाडी, कल्याण, अंबरनाथ इथे फुट ओव्हर ब्रीज, ठाकूर्ली इथे रोड ओव्हर ब्रीज आणि कल्याण स्टेशनचे टर्मिनमध्ये रुपांतर करण्याच्या मागण्या यावेळी शिवसेनेने रेल्वे प्रशानापुढे ठेवण्यात आल्या.

असं असलं तरी ही भेट म्हणजे शिवसेनेने निवडणूक पूर्व तयारी सुरु केल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झालीये.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 8, 2013, 22:01


comments powered by Disqus