Last Updated: Sunday, May 5, 2013, 14:50
www.24taas.com, झी मीडिया, ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोटार सायकलवरून आलेल्या काही अज्ञातांनी एका बिल्डरवर गोळीबार केला. या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झाला आहे.
काल रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास बिल्डर आत्माराम गुलागी यांच्या घराजवळच त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. मोटार सायकलवरून आलेल्या लोकांनी त्यांच्यावर जवळून गोळी झाडली. जखमी बिल्डर गुलागी यांनी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बिल्डरवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहिम अभियान सुरू केले आहे. हा हल्ला कोणत्या कारणामुळे करण्यात आला याची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
First Published: Sunday, May 5, 2013, 14:50