Last Updated: Thursday, September 6, 2012, 14:47
www.24taas.com, नवी मुंबईनवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात एका कुत्र्याच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याच्या शेपटीला फटाका लावून त्याला गंभीर दुखापात केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणीप्रेमी असलेल्या आदिती लाहिरींनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.पोलीसांनी याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबईतील सीबीडी सेक्टर-8 मध्ये राजीव गांधी स्टेडीयम परिसरात 1 सप्टेंबर रोजी एका भटक्या कुत्र्याची हत्या करण्यात आली होती. याआधी याच ठिकाणी 3 महीन्यांपुर्वी एका कुत्र्याला धारदार शास्त्राने वार करून मारले होते, अशी माहिती अदिती लाहिरी यांनी दिली .
सीबीडी पोलीसांनी प्राण्यांना निर्दयतेने वागवणे या कायद्याअतर्गंत आयपीसी ४२८ अतर्गत अज्ञात वक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First Published: Thursday, September 6, 2012, 14:36