Last Updated: Thursday, September 6, 2012, 14:47
नवी मुंबईतील सीबीडी पोलीस ठाण्यात एका कुत्र्याच्या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. कुत्र्याच्या शेपटीला फटाका लावून त्याला गंभीर दुखापात केल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्राणीप्रेमी असलेल्या आदिती लाहिरींनी सीबीडी पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.पोलीसांनी याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.