अरेरे...भाऊबिजेलाच बहिणीची आत्महत्या, suicide In Navi Mumbai

अरेरे...भाऊबिजेलाच बहिणीची आत्महत्या

अरेरे...भाऊबिजेलाच बहिणीची आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. भाऊबिजेलाच बहिणीनीने आत्महत्या केली. भावाला ओवाळून तिने आत्महत्या केल्याने सीबीडी-बोलापूर येथील आग्रोळी गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्येचे नेमेके कारण समजू शकलेले नाही.

सुगंधा प्रमोद भोईल या २२ वर्षीय विवाहितेने कौटुंबिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. भाऊबिजेला आलेला भाऊ जेवणासाठी थांबला नाही, याचा राग बहिणाला आल्याची चर्चा परिसरात आहे. सुगंधा हिचा विवाह जून महिण्यात आला होता.

सुगंधाचा भाऊ मंगळवारी दुपारी भाऊबिजेला आला होता. भाऊबीज करून तो परत गेला. त्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिने घरातील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेच्यावेळी घरात कोणीही नव्हते. त्यामुळे नेमके कारण समजू शकलेले नाही, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेची नोंद सीबीडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, November 6, 2013, 16:23


comments powered by Disqus