'सिंधुदुर्ग'चा बंद झाला मार्ग - Marathi News 24taas.com

'सिंधुदुर्ग'चा बंद झाला मार्ग

 विकास गावकर, www.24taas.com,  सिंधुदुर्ग
 
सिंधुदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांना घेऊन जाणारी प्रवासी वाहतूक सोमवारपासून बंद करण्यात आली आहे.पावसाळ्यात चार महिने समुद्र खवळलेला असतो.म्हणून पावसाचे चार महिने ही वाहतूक  बंद ठेवण्यात येते.खळाळणा-या लाटांच्या मधोमध समुद्रात खडकाळ बेटावर आअसलेला हा किल्ला आणि आजूबाजूला नारळाची झाडं अशा या तटबंदी सागरी सिंधुदुर्ग किल्ल्याला यावर्षी विक्रमी पर्यटकांनी भेट दिली.
 
 
मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायचं असेल तर समुद्र मार्गेच जावं लागतं.तिथपर्यंत पोहोचण्यासाठी होड्यांचा आधार घ्यावा लागतो. मालवणच्या बंदर जेट्टीवरून ही वाहतूक सुरू होते. शिवाजी महाराजांनी बांधलेला हा जलदुर्ग आजही पर्यटकांचं आकर्षण आहे.सागरी आरमाराचा भक्कम तळ असलेला हा किल्ला वर्षोंवर्षे समुद्राच्या लाटा आपल्या अंगावर झेलतोय
 
इ.स.१९६५ मधे हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वत:च्या देखरेखीखाली बांधला. किल्ल्यात शिवाजी महाराजांची विरासनात बसलेली मूर्ती आहे. आजही त्या मूर्तीची लोक पूजा करतात. या वर्षी विक्रमी म्हणजे पाच लाख पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्लाला भेट दिली. आता चार जून पासून किल्ला होडी प्रवासी वाहतूक बंद झाल्यानं किल्ल्याचं दर्शन घेण्य़ासाठी पर्यटकांना चार महिने प्रतिक्षा करावी लागेल.पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही प्रवासी वाहतूक दरवर्षी बंद ठेवली जाते.
 
अलिकडे कोकणात पर्यटकांचा ओघ वाढलेला आहे. त्यातच कोकणच्या पर्यटनाचं आशास्थान ठरणा-या या किल्ल्यावर जाण्यासाठी पर्यटकांना कोणतीही सुविधा नसते. त्यामुळे पावसाळ्यातही किल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्था असवी अशी मागणी कोकण प्रेमींकडून होत आहे.
 
 

First Published: Monday, June 4, 2012, 13:59


comments powered by Disqus