Last Updated: Thursday, June 7, 2012, 09:09
www.24taas.com, वसई पावसाळा अगदी तोंडावर आलाय. सर्वत्र मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. वसईतले मीठ उत्पादकही सध्या आपल्या मीठाची झाकपाक करण्यात व्यस्त आहेत. वादळाचा अंदाज घेऊन मीठ उत्पादक मीठाला झाकण्याची तयारी सुरू झाली.
वसईच्या उमेळा गावातल्या मीठ कामगारांना आता बसण्याचीही उसंत नाही. कारण आकाशात ढग जमा होऊ लागल्यानं मीठाला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू झाली आहे. आगारात तयार झालेलं मीठ हे कामगार कोरड्या जागेवर आणत आहेत. तिथं या मीठाचा ढिग लावून छोटासा डोंगर बनवला जातो. गवताच्या सहाय्यानं हे मीठ झाकलं जातं. तारेच्या सह्याय्यानं हा ढिगारा बांधून तीनही कोप-यांना मातीचा लेप लावला जातो. जेणेकरून कितीही पाऊस पडला तरी मीठ सुरक्षित राहिल. झाकलेलं हे मीठ आत दिवाळीतच उघडलं जाईल
मीठ झाकण्याचं काम पूर्ण झाल्यानंतरच कामगार सुटकेचा निश्वास टाकतील. पण त्याहून आणखी मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे तो म्हणजे पुढिल चार महिन्यांचा...मीठागरावरचं काम बंद झाल्यामुळे त्यांना आता पर्यायी कामही शोधावं लागणार आहे.
First Published: Thursday, June 7, 2012, 09:09