Last Updated: Sunday, June 10, 2012, 23:02
www.24taas.com, अलिबाग पावसामुळं मुंबई गोवा हायवेवर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. वडखळ नाका-नागोठणे दरम्यान वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
दोन तासांपासून वाहतूक खोळबंली असून, रस्त्यांवर सुमारे 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे गावावरून येणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली.
दरम्यान, रविराच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांच्या मदतीला पाऊस धावून आला. अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला. मुंबई आणि उपनगरांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत.. हा जरी मान्सूनचा पाऊस नसला, तरी सुट्टीच्या दिवशी पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.
सकाळपासूनच मुंबईत सायन, वरळी, दादर या भागात पाऊस पडतोय. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतही पावसाची रिमझिम सुरुच आहे.. मान्यून अजूनही रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे इथं अडकून पडल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय.
First Published: Sunday, June 10, 2012, 23:02