आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली... - Marathi News 24taas.com

आंदोलनाची ठिणगी पुन्हा पेटली...

www.24taas.com, जैतापूर
 
जैतापुरात अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात आंदोलनाची थिनगीनं पुन्हा एकदा पेट घेतलाय. शिवसेनेच्या मदतीनं स्थागिक ग्रामस्थांनी प्रकल्पस्थळी घुसून सामूदायिक शेती आंदोलन सुरू केलंय. हजारो प्रकल्पग्रस्त आपल्या जनावरांसह रस्त्यावर उतरलेत.
 
आंदोलनाला बंदीचे आदेश असतानाही या आंदोलकांनी हे पाऊल उचललंय. या परिसराची जमीन ही पूर्वापार शेतजमीन आहे. आणि इथं शेती करणं हा ग्रामस्थांचा हक्क आहे, असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. परिसरात 34 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 700 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात जमावबंदीचं कलम 144 लागू करण्यात आलंय. पोलिसांनी अनेक आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. पोलिसांनी स्थानिक शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह काही आंदोलकांवर प्रकल्पस्थळी फिरकण्यास अगोदरच बंदी घातली आहे. पोलिसांनी अटकाव केल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मागच्या चार महिन्यांपासून थंड असलेलं हे आंदोलन आता कोणतं रुप धारण करेल, याकडे सगळ्यांचच लक्ष लागलंय.
 
 
.

First Published: Wednesday, June 13, 2012, 12:40


comments powered by Disqus