Last Updated: Sunday, October 2, 2011, 14:12
झी २४ तास वेब टीम, डोंबिवली
डोंबिवली येथील सोनारपाडा गावात ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून ७८ बांग्लादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं आहे. यात २७ पुरूष ४१ महिला आणि १० मुलांचा समावेश आहे.या सर्वांवर परदेशी कायदा कलम १९४६ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.डोंबिवलीतील विष्णुनगर भागामध्ये याआधीही गुन्हे अन्वेषण विभागातर्फे २२बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली होती.
या महिलाबारमध्ये काम करत असून त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी लागणारा कोणताहीपुरावा नसल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण शंभरनागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. बिना परवाना वास्तव्यासअसलेल्या परदेशी नागरिकांवर त्वरित कारवाई करा, असा आदेश सहाय्यक पोलिसआयुक्त पी जी केंद्र यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेला दिला होता.आयुक्तांच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत करण्यातआलेल्या कारवाईंमधील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
First Published: Sunday, October 2, 2011, 14:12