२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक - Marathi News 24taas.com

२५ लाखांची फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक

www.24taas.com, वसई
 
25 लाखांची फसवणूक करणाऱ्या एका इसमाला वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एटक केली आहे. भगवानदास महादेव मेजवानी असं आरोपीचं नाव आहे.
 
भगवानदासने वसईत राहणाऱ्या एका व्यक्तीला 'तुम्हाला 2 लाख डॉलर्सची लॉटरी लागली आहे' असा ई-मेल पाठवला होता. त्यासाठी प्रोसेसिंग फी आणि इतर चार्जेसची अनेक खोटी कारणं सांगून पैशांची मागणी करत पैसे वसईतल्या विविध बॅंकांमध्ये भरण्यास सांगितले. फसवणूक झालेल्या इसमाने आतापर्यंत 25 लाख आरोपीने सांगितलेल्या विविध खात्यात भरले होते.
 
ही 12 ते 15 जणांची टोळी असून यामध्ये 2 महिलांचा समावेश आहे. माणिकपूर पोलिसांनी ठाण्याच्या सायबर क्राईम सेलच्या मदतीने भगवानदासला अटक केलीय. या टोळीचा मुख्य सूत्रधार परदेशात असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
 
 

First Published: Tuesday, July 10, 2012, 09:30


comments powered by Disqus