Last Updated: Wednesday, July 11, 2012, 08:30
www.24taas.com, कर्जत रायगड जिल्ह्यात चौक गावात अतिसाराची साथ आली आहे. दूषित पाण्यानं ही साथ आल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे. अधिकाऱ्यांनी साथ अटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले आहेत.
रायगड जिल्ह्याच्या चौक गावात दोन दिवसापासून अतिसाराची साथ सुरु आहे.चौक गाव शेजारील नवीन वसाहत गावातील ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली असून २० रुग्णांवर चौक शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.सुरुवातीला गांभीर्य नसणाऱ्या अधिका-यांनी साथ अटोक्यात आणण्यासाठी मोठ्या शर्थीने प्रयत्न सुरु केले आहेत.
दुषित पाणी पुरवठा झाल्यांमुळे ही साथ आल्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाणी पुरवठा टाकी साफ न केल्याने अतिसारची लागण झाली झाल्याचा आरोप गावक-यांनी केलाय. पावसाळ्यात साथीच्या आजारांची भीती असते त्यामुळे आधीच खबरदारी बाळगणं महत्त्वाचं आहे.
First Published: Wednesday, July 11, 2012, 08:30