कसाऱ्याजवळ लोकल आणि एक्सप्रेसची टक्कर - Marathi News 24taas.com

कसाऱ्याजवळ लोकल आणि एक्सप्रेसची टक्कर

www.24taas.com, कसारा
 
मुंबईत कसा-याजवळ मोठी दुर्घटना घडलीय. कसारा लोकल आणि विदर्भ एक्सप्रेसची टक्कर झालीय. कसारा लोकल कसा-याहून सीएसटीकडे येत होती. आणि विदर्भ एक्सप्रेस मुंबईहून नागपूरला जात होती.
 
कसारा लोकल रुळावरुन घसरली आणि बाजूच्याच ट्रॅकवर समोरुन विदर्भ एक्सप्रेस येत होती. त्याला कसारा एक्सप्रेसची धडक बसलीय. चार ते पाच डबे अपघातग्रस्त झालेत. अंधार असल्यानं मदतकार्यात अडथळा येतोय. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय, तर ४० ते ५० जण जखमी झाल्याची माहिती देण्यात येत आहे.  पण अजून निश्चित आकडा समजू शकलेला नाही. या अपघातामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. कसा-याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.
 

First Published: Thursday, July 19, 2012, 23:52


comments powered by Disqus