महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, केला खून - Marathi News 24taas.com

महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, केला खून

www.24taas.com, कु़डाळ
 
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असाच प्रकार कु़डाळमध्ये घडला आहे. एका ४० वर्षीय विवाहितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र यात महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. तेंडोली-खालची आदोसेवाडी येथील माळरानावर महिलेचा निर्घृण खून संशयित प्रदीप उराण याने केला.
 
झारखंड येथून आरोपी सहा महिन्यांपूर्वी येथे कामासाठी आला होता. यापूर्वी सहा महिने त्याच बागमालकाच्या अन्य बागेत कामाला होता. कामासाठी घरापासून दोन किलोमीटरवर जात. त्यांचा मार्ग याच बागेतून जातो. या ठिकाणी वस्ती नाही. नऊ दिवसांच्या कालावधीत संशयिताने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा हेतू त्याच्या मनात होता.
 
शनिवारी सकाळी महिला ज्या पायवाटेने जात होत्या, त्या ठिकाणी तो बसून राहिला. त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला. त्याला त्यांनी प्रतिकार केला. त्याच्या हाताच्या बोटाचा चावा घेतला. दोघांत झटापट झाली. यात त्यांच्या हातातील काचेच्या बांगड्या तुटल्या. चप्पल झुडपात फेकले गेले. हा प्रकार महिला सगळ्यांना सांगेल, या भीतीने व रागातून त्याने महिलेचा खून केला.
 
 
 

First Published: Wednesday, August 1, 2012, 08:45


comments powered by Disqus