मित्राने मित्राचा काटा काढला - Marathi News 24taas.com

मित्राने मित्राचा काटा काढला

झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
पुर्ववैमनस्यातून मनगटापासून हात तोडण्याची घटना बदलापूरजवळ घटलीय. मारुती रेमार यानं कोयत्यानं रामदास मेंगळचे हात तोडले. त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जुन्या भांडणातून एका मित्रानेच आपल्या मित्राचे हात निर्दयीपणे तोडलेयेत.
 
काही कारणांपूर्वी या मित्रांमध्ये क्षुल्लक कारणांवरून भांडण झाले होते, या भांडणाचा राग मारूतीच्या मनात होता, शुक्रवारी रात्री मारूतीने रामदासला भाताच्या गिरणीवर जेवणासाठी बोलावले आणि त्याला खाली पाडून निर्दयीपणे त्याचे दोन्ही हात छाटले..
 
क्रौर्याची सीमा इथेच संपत नाही तर मारूतीने त्याच्या हाताचे दोन्ही पंजे प्लास्टिकच्या पिशवीत टाकून जमिनीत पुरून टाकले. आणि मारूतीने घटनास्थळाहून पळ काढला, अखेर गावकऱ्यांनी रामदासला सायन रुग्णालयात दाखल केले.

First Published: Saturday, December 17, 2011, 12:53


comments powered by Disqus