Last Updated: Monday, December 26, 2011, 22:00
झी 24 तास वेब टीम, कल्याण कल्याण पूर्वेकडच्या उड्डाण पुलाचं काम रखडल्यानं त्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. लोकांचे प्रचंड हाल होत असताना स्थानिक नगरसेवक आणि आमदार गणपत गायकवाड यांनी पूल पूर्ण करण्यासाठी काय पाठपुरावा केला ? असा सवाल नागरिक करत आहेत
कल्याण पूर्वेच्या आमदार महाशयांचे असे बॅनर या उड्डाण पुलावर झळकत असले तरी अपूर्ण अवस्थेत असलेला हा उड्डाण पूल कधी पूर्ण होणार ? असा सवाल कल्याणचे नागरिक करतायत..... गणपत गायकवाड हेच या भागाचे नगरसेवक आणि आमदार.... महानगर पालिकेच्या या उड्डाण पुलाचं काम मार्च 2010 मध्ये सुरु झालं आणि मार्च 2011 मध्ये ते पूर्ण होणं अपेक्षित होतं.... पण पुढचं वर्ष उलटायला आलं तरी हे काम अपूर्णावस्थेतच आहे.... गेल्या अनेक महिन्यांपासून काम बंदच पडलंय.... शहरात आधीच वाहतुकीची समस्या असताना पूल अपुर्णावस्थेत असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहनांची आणखीच कोंडी होते आहे.... या कोंडीनं त्रस्त झालेल्या नागरिकांनी या भागातल्या आमदार गणपत गायकवाड यांच्यावर रोष व्यक्त केला आहे.
झी 24 तासनं या समस्येबाबत महापौरांना विचारणा केली तेव्हा पुलासाठी आणखी दीड कोटीचा निधीची गरज असल्याचं सांगत नव्यानं ठराव करून पुलाचं काम पूर्ण करू असं आश्वासन दिलं. जनता लोकप्रतिनिधींना मोठ्या अपेक्षेनं निवडून देते, पण लोकांच्या समस्या त्यांना दिसत नसतील तर असले लोकप्रतिनिधी काय कामाचे असा सवाल कल्याणमधली जनता करु लागली आहे.
First Published: Monday, December 26, 2011, 22:00