ग्रामस्थांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू - Marathi News 24taas.com

ग्रामस्थांच्या मारहाणीत दोघांचा मृत्यू

www.24taas.com, पालघर
 
ठाणे जिल्ह्यातील पालघरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, पालघरमध्ये चोर समजून ग्रामस्थांनी काही लोकांना मारहाण केली, आणि त्यात दोन जणांचा दुर्देवी अंत झाला आहे. पण मृत झालेले दोघजणं चोर नसल्याचे समजते.
 
ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये ग्रामस्थांच्या मारहाणीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. बोईसरजवळील गुंदले गर्वाशेत इथं ही घटना घडली आहे. चोर समजून ग्रामस्थांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. यावेळी ग्रामस्थांनी एक इनोव्हा आणि होंडासिटी गाडीचीही तोडफोड केली. ७ ते ८ जण दोन गाड्यांमधून आले होते. ग्रामस्थांच्या मारहाणीनंतर पाच ते सहा जण पळून गेले.

First Published: Thursday, January 5, 2012, 10:34


comments powered by Disqus