ठाण्यात राष्ट्रवादीत गटबाजी? - Marathi News 24taas.com

ठाण्यात राष्ट्रवादीत गटबाजी?

www.24taas.com,ठाणे
ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर गटबाजी सुरू झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वसंत डावखरे यांनी घेतलेल्या बैठकीत ठाण्याचे शहराध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड आणि खासदार संजीव नाईक यांना निमंत्रणच नसल्याचं पुढं आलंय. त्यामुळं डावखरे आणि आव्हाड यांच्यात गटातटाचं राजकारण रंगलय.
 
वसंतराव डावखरे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांनी ठाण्यात काही कार्यकर्त्यांची बैठक घेतली असेल तर अगदी सगळ्यांना बोलवायला पाहिजे, असे नाही. पक्षात काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी पक्षातील कार्यकर्त्यांना त्यांनी बोलावून घेतले असेल. एखाद्या ज्येष्ठ नेत्याने बैठक घेतली, त्या बैठकीला मला बोलावले नाही आणि त्याबद्दल नाराजी व्यक्त करण्याइतका मोठा नेता मी नाही, असे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले.
 
मी ठाण्याचा राष्ट्रवादीचा शहराध्य़क्ष असलो तरी मी वयाने, अनुभवाने डावखरेंपेक्षा लहान आहे. त्यामुळे त्यांना बैठक घेण्याचा पूर्ण अधिकार असल्याची सारवासारव जितेंद्र आव्हाड यांनी केले.

First Published: Monday, January 9, 2012, 17:21


comments powered by Disqus