स्कूलबसच्या चाकाखाली विद्यार्थी जखमी - Marathi News 24taas.com

स्कूलबसच्या चाकाखाली विद्यार्थी जखमी

www.24taas.com, नवी मुंबई
 
नवी मुंबईत स्कूलबसच्या चाकाखाली येऊन पाचवीत शिकणारा विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली आहे. ड्रायव्हरनं हेल्पर नसतांना स्कूल बस मागे घेतल्यानं हा अपघात घडला.
 
यापक्ररणी वाशी पोलीस ठाण्यात ड्रायव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. प्रथमेश साळुंखे असं जखमी विद्यार्थ्याचं नाव आहे. पाचवीत शिकणारा प्रथमेश शाळा सुटल्यानंतर स्कूल बसची वाट पहात उभा होता. स्कूलबस मागे येत असतांना विद्यार्थ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यात प्रथमेश स्कूलबसच्या मागच्या चाकाखाली पडला.
 
त्याचवेळी एका विद्यार्थानं प्रथमेशला मागे खेचल्यानं बसचं चाक त्याच्या पायाला चाटून गेलं. बसमध्ये हेल्पर नसल्यांच हा प्रकार घडला. यातून पुन्हा एकदा स्कूलबस चालकांचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

First Published: Wednesday, January 11, 2012, 21:23


comments powered by Disqus