मुंडे-गडकरी यांचं जमलं बुवा! - Marathi News 24taas.com

मुंडे-गडकरी यांचं जमलं बुवा!


झी २४ तास वेब टीम, ठाणे
 
भारतीय जनता पक्षाचे नेते  नितीन गडकरी  आणि गोपीनाथ  मुंडे यांच्यातील मैत्रीचे संबंध बिघडल्याने संघर्षाला तोंड फुटले. त्यातून निर्माण झालेला दुरावा अधिकच वाढत चालला होता. मात्र ठाण्यातील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाणे तो दूर झाल्याचं दिसून आला आणि एकदाचं जमलबुवा, असे उद्गार कार्यकर्त्यांनी काढले.
 
निमित्त होतं रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीचे विनय सहस्त्रबुद्धे यांनी लिहलेल्या 'आहे लोकतंत्र तरीही' या पुस्तकाचं प्रकाशन. हा कार्यक्रम ठाण्यात आयोजित  करण्यात आला होता.  यावेळी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर एकत्र आले होते. एवढंच नव्हे तर आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं यावेळी मुंडेंनी स्पष्ट केलं.
 
गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यात वाद निर्माण झाल्याने मुंडे यांनी बंडाचं निशाण फडकावले. त्यामुळे भाजपात वादळ उठलं. हे वादळ क्षमविण्या ऐवजी घोंगावलं. पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी लक्षच दिलं नाही. वाद विकोपाला गेला. शेवटी सुषमा स्वराज, अरूण जेटली यांनी लक्ष घालून उठलेलं हे वादळ क्षमविलं. परंतु  मुंडे आणि गडकरी यांच्यात शित युध्द कायम होतं.  मात्र, आमच्यात कुठलाही वाद नसल्याचं ठाण्यात शेवटी मुंडेंनी स्पष्ट केलं.
 

First Published: Tuesday, October 25, 2011, 06:20


comments powered by Disqus