Last Updated: Tuesday, October 25, 2011, 06:35
झी २४ तास वेब टीम, रत्नागिरीस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आता काँग्रेस-राष्ट्रवादीत पुन्हा जुंपलीय. कोकणात तर दिवाळीतच काँग्रेस- राष्ट्रवादीत शिमगा सुरू झालाय.

नारायण राणेंना संपवण्याचा राष्ट्रवादीचा डाव असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार निलेश राणे यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्यावर काँग्रेसचे खासदार नीलेश राणे यांनी हल्लाबोल केलाय.
निवडणुका जवळ येतील तसा काँग्रेस-राष्ट्रवादीत वाद पेटत चाललाय. नीलेश राणेंनी रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांच्यावर तोफ डागलीय. आजपर्यंत आम्ही सांभाळून घेतलं. पण जर आम्हालाच संपवण्याचा कट असेल तर राष्ट्रवादीबरोबर आघाडी हवीच कशाला ?, अशा शब्दात त्यांनी जाधव यांना टार्गेट केलय.
राष्ट्रवादीकडून राणेंना संपवण्याचा कट असला तरी राणेंना संपवणं शक्य नसल्याचं सांगत त्यांना राष्ट्रवादीला थेट आव्हान दिलं. जाधव यांना जिल्ह्याबाहेरून ताकद मिळत असल्याचं सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टीका केली.
First Published: Tuesday, October 25, 2011, 06:35