मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात - Marathi News 24taas.com

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

www.24taas.com, रायगड
 
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. एसटी बस आणि इंडिका गाडीत जोरदार धडक झाली. या अपघातात इंडिका कारमधील पाच जण जागीच ठार झालेत. हे सर्व प्रवासी मुलूंड येथील रहिवासी असून दिनेश पाटील, सुरेश पाटील, रवींद्र लाड, रवींद्र शिवलकर आणि अनिल सावंत अशी आहेत. हे सर्व मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात असतांना वडखळ जवळ पहाटे ३ च्या सुमारास हा अपघात झाला.
 
 
 

First Published: Sunday, January 22, 2012, 13:31


comments powered by Disqus