Last Updated: Monday, January 23, 2012, 11:56
www.24taas.com, मुंबई 
नारायण राणेंच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादा पवार कोकणच्या दौऱ्यावर आले होते. अजित पवारांनी नारायण राणेंचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर घणाघाती टीका केली.
प्रत्येक निवडणुकीच्या वेळी बळी का जातो असा सवाल करत नारायण राणेंच्या दहशतीच्या राजकारणावर त्यांनी सवाल केला. स्थानिक नेतृत्वाला संधी मिळत नाही असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचा पर्याय त्यांनी सिंधुदुर्गातल्या युवकांना असल्याचं सूचित केलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देऊ तसंच गरिबांना सन्मानाने जगता आलं पाहिजे असंही त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्यासह अनेकांनी अजितदादा पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
First Published: Monday, January 23, 2012, 11:56